गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगेच्या (Panchganga river) पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी ३७.२ फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 5८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. पातळीत वाढ सुरूच आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपासून केवळ दोन फूट दूर आहे. गुरुवारी दुपारी एकवाजेपर्यंत ही पातळी ३७.२ फुटांवर असून, जिल्ह्यातील एकुण 5८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूमधील बारा नदीवरील एकुण ५८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राजाराम बंधारा पाणी पातळी 37 फूट २ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट असून सध्या पाणी पातळी ३७.२ फुटांवर आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कासारी मध्यम प्रकल्प धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणाच्या सांडव्यातून व विद्युत विमोचकाद्वारे नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.