Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : विशाळगडावरील पूर्वेकडील बाजूचा दगडी बुरुज कोसळला

कोल्हापूर : विशाळगडावरील पूर्वेकडील बाजूचा दगडी बुरुज कोसळला

शाहूवाडी तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विशाळगडाच्या प्रथमदर्शनी पूर्वेकडील बाजूचा दगडी बुरुज गुरुवारी सकाळी कोसळला. सुदैवाने गडावरील मलिक रेहानबाबा मलिक उरुसाची बुधवारी सांगता झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे गडप्रेमी नागरिकांची वर्दळ थांबल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

गडावर जाण्या-येण्यासाठी उभारलेल्या लोखंडी जिन्याच्या बाजूचा बुरुज कोसळून दगड, खरमातीचा ढीग या लोखंडी जिन्यावर येऊन पडला आहे. यामुळे या लोखंडी जिन्याच्या मार्गाची वाहतूक बंद करण्यात आला आहे. अशी माहिती शाहवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.

अन्य पर्यायी मार्ग तथा वाटेवरून नागरिक गडावर ये-जा करीत आहेत. सध्या गड व परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी विशेष सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -