Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : पन्हाळा गड ढासळतोय..., ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती

कोल्हापूर : पन्हाळा गड ढासळतोय…, ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती

ऐतिहासिक पन्हाळगडाच्या (chhatrapati shivaji maharaj) तटबंदीला मोठी तडे गेले असून बुरुज ढासळायला सुरुवात झाली आहे. वेळीच पुरातत्त्व विभागाने याचं संवर्धन केलं नाही तर हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या बाबत तीव्र संताप शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.

छत्रपती शिवरायांच्या (chhatrapati shivaji maharaj) कारकिर्दीत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेला किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजू लागला आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत.छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट, पावनखिंडीचा रणसंग्राम, सिद्धी जोहरचा वेढा या सगळ्यांची साक्ष असलेला हा किल्ला आहे. राजा भोज यांच्या कारकिर्दीत बांधलेला हा किल्ला अभेद्य होता. मात्र सरकारी अनास्थेमुळे याची पडझड सुरू आहे. त्यामुळे शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. तर इथले मार्गदर्शकही पर्यटकांना हीच दुरवस्था दाखवायची का असा सवाल सरकारला करत आहेत.

हा किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून त्यांनी याची देखभाल करण्याची गरज आहे. आम्ही याबाबत पुरातत्व विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑफिसचे दार बंद होते. थोड्या वेळाने आतून एक शिपाई बाहेर आला आणि त्याने या कार्यालयाला पूर्ण वेळ अधिकारी नसल्याचं सांगितले. प्रभारी अधिकाऱ्यांना फोन लावून देण्याची विनंती केल्यानंतर आम्ही फोनवर त्यांच्याशी बोललो तर यावर्षी काही कामे हाती घेतल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले. मात्र केंद्राकडून येणारा निधी हा सर्वच किल्ल्यांसाठी खर्च होत असून पन्हाळागडासाठी विशेष असा निधी नसल्याचे त्यांनी नमूद केले. तर स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन निधीमधून पैसे दिले तर गडाचे संवर्धन होईल असे सांगत चेंडू लोकप्रतिनिधीच्या कोर्टात टाकला आहे. पुरातत्व विभाग निधीचे केवळ कारण सांगत असून त्यांना कामेच करायची नसल्याचा आरोप संभाजीब्रिगेडने केला आहे. कार्यालयात अधिकारी पूर्णवेळ नसून गडांच्या देखभालकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पूर्ण वेळ अधिकारी नेमून संवर्धनाचे काम हाती घ्या, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -