Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंग20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार?

20 जुलैला मंत्रिमंडळ विस्तार होणार?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिंदे सरकार सत्तेवर येऊन आता 15 दिवस उलटले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कोणा-कोणाला मंत्रिपद द्यायचे यावरून एकवाक्यता नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, आता 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. दोन टप्प्यात हा विस्तार होईल. पहिल्या टप्प्यात 10 ते 12 मंत्र्यांना शपथ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.



शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरुन अद्याप एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला असून, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे. त्यानंतर 20 जुलै मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यामध्ये शिंदे गटातील पाच ते सहा मंत्र्यांना तर भाजपच्या सहा ते सात मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशाननंतर मंत्रिमंडळाचा मोठा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 19 जुलैपर्यंत दिल्लीमधून सर्व बोलणी होतील. त्यानंतर 20 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असेही सांगण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -