Wednesday, August 27, 2025
Homeराजकीय घडामोडीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढील टार्गेट मुंबईतील शिवसेना भवन?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पुढील टार्गेट मुंबईतील शिवसेना भवन?

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेला (Shiv Sena) बॅकफूट यावे लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena Bhavan) गटाचे पुढील लक्ष्य म्हणजे टार्गेत आता दादरमधील शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बंड केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना आमचीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे.

शिंदे गटात इनकमिंग सुरूच

दोन तृतीयांश आमदारांना आपल्या गटात खेचण्यात एकनाथ शिंदे यांना मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. आता शिवसेनेचे गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्यासाठी जोरदार मोहिम सुरू केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रातोरात दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत, याचे सगळ्यांना नवल वाटत आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री दिल्लीत पार एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून ते आज 12 खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आज लोकसभा अध्यक्षांची देखील भेट घेणार आहे.

शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांच्या सुरक्षेत वाढ

दुसरीकडे, शिवसेनेच्या खासदारांनी नवा गट स्थापन करत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्त्वात 12 खासदारांचा नवा गट स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालय बाहेर पोलिस तैनात आहेत. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनाही पोलिसांचा मोठा बंदोबस्त देण्यात आला आहे. बंडखोर खासदारांच्या कार्यालय निवासस्थाने बाहेर पोलिस बंदोबस्ताने छावणीचे स्वरूप आले आहे.

शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच…

शिवसेनेचे फक्त 14 नव्हे तर 18 खासदार आपलेच आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिवसेनाविरोधात नवा गट करण्याच्या तयारी आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज खासदारांच्या गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेणार आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असून आमच्याकडे बहुमत आहे. सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने निकाल देईल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना आणखी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -