ताजी बातमी ऑनलाईन टीम
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ आज 24 जुलै रोजी पूर्ण झाला आहे. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या म्हणजेच सोमवारी 25 जुलै रोजी देशाच्या सर्वोच्च पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती असताना रामनाथ कोविंद हे देशातील सर्वात भव्य निवासस्थानी म्हणजे राष्ट्रपती भवनात राहत होते. या पदावर असताना त्यांना अनेक सोयीसुविधांसह मोठा पगार (Presidents salary) मिळत होता. परंतु आता राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना किती पेन्शन मिळणार? कोणकोणत्या सुविधा मिळणार? ते कुठे राहणार? असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील तर येथे आम्ही तुम्हाला या सर्व प्रशांची उत्तरे देणार आहोत.
देशाच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही रामनाथ कोविंद सुख सुविधांनी परिपूर्ण आयुष्य जगणार आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना सरकारकडून अनेक भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. माजी राष्ट्रपती म्हणून त्यांना राहण्यासाठी सरकारी निवासस्थान दिले जाईल. यासोबतच त्यांना भरघोस पेन्शनही मिळणार आहे.
रामनाथ कोविंद यांना कोणत्या सुविधा मिळणार?
राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रामनाथ कोविंद यांना आयुष्यभरासाठी दरमहा दीड लाख रुपये पेन्शन मिळणार आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची जोडीदार सवित कोविंद यांनाही दरमहा 30 हजार रुपयांची सेक्रेटेरियल मदत दिली जाणार आहे.
रामनाथ कोविंद आणि त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण सुसज्ज बंगला दिला जाणार आहे.
रामनाथ कोविंद यांना मोफत लँडलाइन आणि मोबाईल फोनचीही सुविधा मिळणार आहे.
रामनाथ कोविंद यांना माजी राष्ट्रपती म्हणून पाच लोकांचा वैयक्तीक स्टाफही मिळणार आहे. तसेच स्टाफच्या खर्चासाठी त्यांना वर्षाला 60 हजार रुपयेही मिळतील.
रामनाथ कोविंद यांना त्यांची पत्नी सविता कोविंद यांच्यासोबत रेल्वे किंवा विमानाने मोफत प्रवास करण्याची सुविधाही मिळेल