हिंदू धर्मात सण आणि विशेष प्रसंगी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर केलेले कार्य नेहमीच फलदायी असते अशी मान्यता आहे. आज 28 जुलै रोजी (Gurupushyamrut 2022 Date) गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे आज शुभ कार्यासाठी आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र (Guru Pushya Nakshatra 2022) अत्यंत चांगले मानले जाते. खरेदीसाठी हा योगअतिशय शुभ (Guru Pushya Yoga Singnificance) मानला जातो. हे गुरु-पुष्य नक्षत्र 28 जुलै रोजी संपूर्ण दिवसभर आणि रात्री देखील आहे.
गुरुपुष्यामृतयोगाचे महत्त्व
गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग असतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केल्याच त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह केला जात नाही. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानला जातो. खरेदी आणि गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी हा मोठा योग आहे.
गुरुपुष्यामृतयोग 2022 शुभ मुहूर्त
गुरुपुष्यामृतयोग तिथी : 28 जुलै 2022 रोजी (गुरुवारी) आहे.
गुरुपुष्यामृतयोग आरंभ : 28 जुलै 2022 रोजी रोजी सकाळी 07:06 वाजता
गुरुपुष्यामृतयोग समाप्ती : 29 जुलै 2022 रोजी सकाळी 09:47 वाजता
गुरुपुष्यामृतयोगाचे खास वैशिष्ट्ये
ज्योतिष शास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते. पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे. लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचे असेल तर पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तांपैकी एक आहे. अभिजीत मुहूर्त हा नारायणाच्या ‘चक्रसूदर्शना’इतकाच शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. तरीही पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभ मुहूर्त इतर मुहूर्तांच्या तुलनेत सर्वोत्तम मानला जातो.