Tuesday, August 5, 2025
Homeक्रीडाटीम इंडियाने वन डे सीरिज केली आपल्या नावावर, तिसरा सामना 119 रन्सने...

टीम इंडियाने वन डे सीरिज केली आपल्या नावावर, तिसरा सामना 119 रन्सने जिंकला!

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील वनडे सीरीजमधील तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाने (Team India) जबरदस्त कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाने जबरदस्त खेळी करत वनडे सीरिज आपल्या नावावर केली आहे. 119 धावांनी हा सामना जिंकत टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा जबरदस्त पराभव केला आहे. या सामन्यात शुभमन गिलची धडाकेबाज खेळी आणि युजेंद्र चहलच्या अचूक माऱ्यापुढे टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा पराभव करता आला. टीम इंडियाने वेस्ट इंडीजचा त्यांच्याच मायभूमीत पराभव करत विजय मिळवला.

भारताने सलग तिसरी वनडे सामना जिंकून वन डे सीरिज आपल्या खिश्यात घातली आहे. या सामन्यात टॉस जिंकून भारताने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. तुफान फटकेबाजीनंतरही या सामन्यात पावसामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या होत्या. पावसामुळे सामना 40 ओव्हर्सचा करण्यात आला होता. पण 36 ओव्हर झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना थांबवण्यात आली. या सामन्यात टीम इंडियाने 225 धावा केल्या. ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या. पण टीम इंडियाच्या खेळाडूंच्या दमदार खेळीपुढे वेस्ट इंडिच्या खेळाळूंना हार मानावी लागली. 137 धावांतच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला.

शुभमन गिलने धडाकेबाज खेळी करत 98 रन्स केले. अवघ्या 2 रन्समुळे शुभमन गिलला शतक पूर्ण करता आले नाही. शिखर अर्धशतक (58) झळकावून बाद झाला. यानंतर इतर खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली पण पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला. तरी सुद्धा या सामन्यात युजेंद्र चहलने 4 विकेट, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाला एक-एक विकेट घेतल्या आणि हा सामना जिंकला. टीम इंडियाच्या या विजयानंतर सर्वस्तरावरुन त्यांचे कौतुक होत आहे. महत्वाचे म्हणजे 1983 पासून पहिल्यांदाच टीम इंडियाने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -