Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजनरणबीर-श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटला आग, तरुणाचा मृत्यू, शूटिंग पुढे ढकलले

रणबीर-श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या सेटला आग, तरुणाचा मृत्यू, शूटिंग पुढे ढकलले

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी अनटायटल चित्रपटात शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली. चित्रपटाचा हा सेट मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आला होता. या आगीत ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे डॉक्टर सदाफुले यांनी दिली. एएनआयच्या वृत्तानुसार, अंधेरी पश्चिम येथील चित्रकूट स्टुडिओमध्ये सायंकाळी साडेचार वाजता ही आग लागली. रणबीर आणि श्रद्धा लवकरच चित्रपटाचे शूटिंग करणार होते. पण लेव्हल-२ च्या आगीमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे.


मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई अग्निशमन दलाने सांगितले की, २९ जुलै रोजी रात्री १०.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली. स्टुडिओला लागलेल्या आगीचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओ आणि चित्रांमध्ये आकाशात भीषण आग आणि काळा धूर दिसत होता. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाजही ऐकू येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -