Monday, July 7, 2025
Homeतंत्रज्ञानWhatsAppने एका महिन्यात ब्लॉक केले भारतातील २० लाखांवर अकाऊंट

WhatsAppने एका महिन्यात ब्लॉक केले भारतातील २० लाखांवर अकाऊंट



व्हॉटस्अॅपने जून महिन्यात भारतातील २० लाखांवर अकाऊंट बंद केले आहेत. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार व्हॉटसअॅपने (WhatsApp) जून महिन्याचा अहवाल सादर केला आहे. त्यातही माहिती देण्यात आली आहे. व्हॉटसअॅपने बंद केलेल्या अकाऊंटची संख्या २२ लाख १० हजार इतकी आहे.

व्हॉटसअॅपने (WhatsApp) दिलेल्या माहितीनुसार, ज्या अकाऊंटविरोधात तक्रारी आल्या आहेत, असे अकाऊंट बंद केल्याचे सांगितले आहे. भारतीय कायदे किंवा व्हॉटसअॅपच्या अटी शर्थीचा भंग केला तर व्हॉटसअॅप अशा प्रकारची कारवाई करू शकते.

grievance officer wa@support.whatsapp.com या इमेलवर व्हॉटसअॅप तक्रारी घेत असते. या तक्रारींची खातरजमा करून व्हॉटसअॅप पुढील कारवाई करते. या इमेलवर तक्रार करताना इलेक्ट्रॉनिक सहीची आवश्यकता असते. तसेच ज्या नंबरची आपल्याला तक्रार करायची आहे, त्या नंबरचा इंटरनॅशनल कोडही देणे आवश्यक असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -