भाजपचे खासदार मनोज तिवारी यांच्याविरोधात दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाईक केली आहे. हर घर तिरंगा मोहिमेसाठी मनोज तिवारी दिल्लीतील बाईक रॅलीमध्ये (bike rally) सहभागी झाले होते. मात्र, या रॅली दरम्यान त्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नव्हते.
तिवारी हे हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला असून तिवारी यांना वेगवेगळ्य नियमांचे उल्लधन केल्याप्रकरणी 21 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान ज्या व्यक्तीची दुचाकी तिवारी चालवत होते त्या दुचाकीच्या (bike rally) मालकाला ही दंड ठोठावण्यात आला आहे.
बाईक रॅलीत खासदार तिवारी हेल्मेटशिवाय –
भाजपचे अनेक खासदार तिवारींसह लाल किल्ला ते नवी दिल्लीतील संसद भवनदरम्यान आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही बाईख रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅला दरम्यान तिवारी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होते.
मनोज तिवारी यांचे ट्वीट –
याबाबत खासदार तिवारी यांनी ट्विटरवरून आपण हा दंड भरणार असल्याचे म्हटले आहे. यावर आजमी हल्मेट घातले नाही याबद्दल माफी मागतो. दिल्ली वाहतूक पोलिसांना मी सांगू इच्छितो की मी सर्व दंड भरणार आहे. या फोटोंमध्ये गाडीची नंबर प्लेट दिसत आहे. हा फोटो लाल किल्ल्याजवळ काढण्यात आला आहे. कोणीही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नये अशी मी विनंती करतो. सुरक्षितपणे वाहन चालवा तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला तुमची गरज आहे, असे ट्विट तिवारी यांनी केले आहे.
21 हजारांचा दंड –
आम्ही चालकाला दंड ठोठावला असून एकून २१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या गाडीच्या मालकालाही दंड ठोठावण्यात आला असून पीयूसी प्रमाणपत्र, एसएसआरपी आणि इतर नियमांचे उल्लंघन असा एकूण २० हजारांचा दंड दुचाकीच्या मालकाला ठोठावण्यात आला आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते सुमन नालवा यांनी दिली.