Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरराज्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम

राज्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम



राज्यात मागील तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. त्यातही कोकण आणि विदर्भात 12 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान सोमवारी राज्यात सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. बंगालच्या उपसागरापासून ते ओरिसाची किनारपट्टी उत्तर आंध्र प्रदेश आणि पुन्हा मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. पुढील 24 तासांत या पट्ट्यांचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. या बरोबरच महाराष्ट्र-कर्नाटकच्या किनारपट्टीदरम्यान द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

रेड अॅलर्ट : (दि. 9) पालघर, रायगड, नाशिक, पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया ऑरेंज अलर्ट : (ऑगस्ट महिन्यातील तारखा) नाशिक (10 व11), पुणे (10), कोल्हापूर (9), सातारा (9 ते 11), नांदेड (9), अकोला (11), अमरावती (9 ते 11), बुलडाणा (9), चंद्रपूर (10), गडचिरोली (10), नागपूर (9), वर्धा (9).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -