ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : मोहरमच्या नवव्या दिवशी म्हणजेच सोमवारी खत्तलरात्रीनिमित्त खाई फोडण्याचा पारंपरिक विधी झाला. शहरातील तालीम संस्थांच्या परिसरातील खाई फोडण्याच्या विधीवेळी हिंदू-मुस्लिम भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, इतर दिवशींप्रमाणेच पीर पंजे भेटीचा सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. साऊंड सिस्टीमचा दणदणाट व नेत्रदीपक विद्युत रोषणाईच्या संगतीत भरपावसात भेटीसाठीच्या मिरवणुका निघाल्या.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे इतर सण-उत्सवांप्रमाणेच मोहरम सणावरही विविध निर्बंध होते. यामुळे प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत मोहरम सणातील सर्वच विधी साधेपणाने आणि प्रतीकात्मक पद्धतीने साजरे करण्यात आले. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने सर्व सण-उत्सव निबंधमुक्त साजरे होत आहेत.
कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -