Wednesday, August 6, 2025
Homeयोजनानोकरीज्युनिअर इंजिनिअरच्या विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळेल पगार

ज्युनिअर इंजिनिअरच्या विविध पदांसाठी भरती, 1 लाख रुपयांपेक्षा जास्त मिळेल पगार

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ज्युनिअर इंजिनिअरच्या विविध पदांच्या भरतीसाठी (SSC JE Recruitment 2022) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, क्वांटिटी सर्व्हेइंग आणि कॉन्ट्रॅक्टमधील ज्युनिअर इंजिनिअरची पदं भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत किती पदं भरली जाणार आहेत त्याची संख्या नंतर कळवली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकतात.

एसएससी विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन, सेंट्रल पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, सेंट्रल वॉटर कमिशन आणि मिलेट्री इंजीनियर सर्व्हिस यासह इतर विभागांमध्ये सिव्हिल, मॅकॅनिक, इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये विविध ज्यूनिअर इंजिनिअर पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु – 12 ऑगस्ट 2022
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 2 सप्टेंबर 2022
फी भरण्याची अंतिम तारीख – 3 सप्टेंबर 2022
CBT- नोव्हेंबर 2022

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंगची पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. त्यासोबत उमेदवारांना दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. अधित माहितीसाठी उमेदवाराने अधिकृत अधिसूचना तपासावी.

वयोमर्यादा

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 32 वर्षे या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट दिली जाणार आहे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट दिली जाणार आहे.

अधिकृत वेबसाइट

ssc.nic.in

वर जाऊन अर्ज करू शकतात.

निवड प्रक्रिया

या भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षेद्वारच उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पेपर-I (CBT) आणि पेपर-II मधील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पेपर-1 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पेपर-2 साठी परीक्षा देता येणार आहे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. तर पेपर-1 (CBT) नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल.

पगार

ज्यूनिअर इंजिनिअर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे.

अर्ज फी
– सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
– एससी, एसटी, दिव्यांग वर्ग आणि सर्व वर्गातील महिलांना परीक्षा फी माफ असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -