ताजी बातमी ऑनलाईन टीम
फॅट टू फिट असा प्रवास करणाऱ्या भूमी पेडणेकच्या नव्या लूकमुळे सर्वच जण आश्चर्यचकित होत आहेत. एकेकाळी बेढब असणारी भूमी आता खूपचं ग्लॅमरस दिसत आहे. विशेष म्हणजे ती पूर्वीपेक्षा खूप बारीक आणि सुंदर दिसतेय. आपल्या पहिल्या चित्रपटामध्ये ओव्हरवेट महिलाची भूमिका साकारून तिने हे सिध्द केलं होतं की, या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत ती अन्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

भूमीला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येऊन काही वर्षे झाली आहेत. इतक्या कमी वयात तिने ऑनस्क्रीन ज्या प्रकारे भूमिका साकारल्या, त्या वाखाणण्याजोगे आहेत. स्क्रीनवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिचं करिअर ऊंचीवर आहे. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर तिने आपल्या वजनावर लक्ष केंद्रीत केलं होतं. वजन कमी करून ती आपल्या ओरिजन बॉडीशेपमध्ये आली.