Monday, July 7, 2025
Homeअध्यात्मआज आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची...

आज आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

हिंदू धर्मात भगवान गणपतीला विशेष महत्त्व असून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. धार्मिक ग्रंथानुसार गणपतीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी तिथीला व्रत आणि पूजा केली जाते. यावेळी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 15 ऑगस्ट रोजी आहे. या चतुर्थीला संकष्टी आणि हेरंब चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकटे दूर होतात व सुख आणि सौभाग्यही वाढते अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतरच आपले व्रत पूर्ण करतात.


हा आहे शुभ मुहूर्त आणि योग
पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रविवारी 14 ऑगस्ट रोजी रात्री 10:35 पासून सुरू होईल, तर सोमवार 15 ऑगस्ट रोजी रात्री 09:01 चतुर्थी समाप्त होईल. उदयतिथीनुसार संकष्टी चतुर्थी व्रत 15 ऑगस्टला केले जाईल. या दिवशी गड आणि धृती नावाचा शुभ योग देखील जुळून येत आहे. तसेच मीन राशीमध्ये चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी नावाचा राजयोग देखील या दिवशी येत आहे.

ही आहे शुभ वेळ
15 ऑगस्ट रोजी अभिजित मुहूर्त रात्री 11.59 ते 12.52 पर्यंत असेल. तर धृती योग सकाळपासून रात्री 11.24 पर्यंत राहील. यासह 15 ऑगस्ट रोजी व्रतपूजेचा मुहूर्त रात्री 09.27 पासून सुरू होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -