Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीखोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो... अशा घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्य विधिमंडळाचे आज, बुधवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर असताना ज्यांनी सरकारचे वाभाडे काढण्यासाठी बाह्या वर केल्या होत्या, तोच भाजप पक्ष आता सत्ताधारी बाकावर बसणार असल्याने त्यांची सरकारच्या बाजूने उभे राहताना कसोटी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… अशा अनेक घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला. विरोधीपक्षांने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.



विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विरोधीपक्ष आक्रमक झाला आहे. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे. हे गद्दार सरकार असून ते कोसळणारच असा दावा देखील, आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय…घोषणांनी दणाणला विधानभवन परिसर
– आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधी पक्षांच्यावतीने ईडी सरकारला धारेवर धरण्यात आले.
– विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात विरोधीपक्ष आक्रमक…
– ओला दुष्काळ जाहीर करा…
-अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा…
-ईडी सरकार हाय हाय…
– या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय…
– आले रे आले 50 खोके आले…
– खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो… स्थगिती सरकार हाय हाय… महाराष्ट्राशी गद्दारी, सत्तेत आली शिंदेची स्वारी… आले रे आले गद्दार आले..
– गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -