हिंदू धर्मात गणपतीला आराध्य दैवत मानले जाते. भारतात गणपतीची अनेक मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आणि वैशिष्ट्ये आहे. अशात इंदूरच्या विद्याधाम गणपतीचे वेगळे वैशिष्ट्ये असून या ठिकाणी गणपती आपल्या पाच बायकांसह दोन्ही मुले आणि नातवंडांसह विराजमान आहे. मान्यतेनुसार गणपतीचे हे एकमेव मंदिर आहे जेथे ते संपूर्ण कुटुंबासह उपस्थित आहेत. चला तर मग जाणून घ्या या मंदिराविषयी काही खास गोष्टी.
मध्य प्रदेशातील इंदूर शहराच्या पश्चिम विभागातील विद्याधाममध्ये हे प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. या मंदिरात भगवान गणेश त्याच्या पाच पत्नी रिद्धी, सिद्धी, तुषी, पुष्टी, श्री आणि मुले लाभ, शुभ आणि 2 नातवंडे आमोद, प्रमोद यांच्यासह विराजमान आहेत. 1995 मध्ये जेव्हा विद्याधाम बांधले गेले तेव्हा या ठिकाणी असलेल्या 14 मंदिरांमध्ये गणपतीचे मंदिर बांधण्यात आले होते. या जागेची स्थापना महामंडलेश्वर गिरजानंद सरस्वती यांच्या हस्ते करण्यात आली आहे. गणेशोत्सव दरम्यान, मंदिरात दररोज धार्मिक विधी पार पडत असतात. यामध्ये 108 गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाशिवाय 1100 लाडूंचा नैवेद्याचा विशेष कार्यक्रम होतो.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे रिद्धी -सिद्धी, तुषी, पुष्टी आणि श्री या गणेशाच्या पाच पत्नी आहेत. बहुतेक मंदिरांमध्ये गणपती हे रिद्धी-सिद्धीसोबतच दिसतात. तर गणपतीच्या इतर तीन बायकांबद्दल भक्तांना फार कमी माहिती आहे. गणपतीच्या पाच बायकांबद्दल शास्त्रात उल्लेख आहे. याशिवाय दोन मुलगे लाभ-शुभ आणि नातू आमोद, प्रमोद हे या मंदिरात विराजमान आहेत. मंदिराचे हे स्थान प्रामुख्याने श्री विद्या राजराजेश्वरी माँ परंबा ललिता महात्रिपुरसुंदरी यांना समर्पित आहे. याठिकाणी महात्रिपुरसुंदरी देवीची आठ फूट उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीमध्ये देवी सिंहावर नसून महादेवाच्या नाभीतून निघणाऱ्या कमळावर विराजमान आहे.
इंदूरमध्ये पाच बायकांसोबत विराजमान आहे गणपती बाप्पा, जाणून घ्या मंदिराचं वैशिष्ट्य
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -