Monday, August 4, 2025
Homeमनोरंजनरणवीर-दीपिका बनले सेल्सपर्सन, कपिल, रोहित आणि गांगुलीनेही केलं जोरदार प्रमोशन

रणवीर-दीपिका बनले सेल्सपर्सन, कपिल, रोहित आणि गांगुलीनेही केलं जोरदार प्रमोशन

सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone, Ranveer Singh) यांच्यासोबत विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma), बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि भरतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा एक जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट मीशोच्या (Meesho) जाहिरातीत हे सर्व कलाकार सेल्समनच्या रूपात दिसत आहेत. हे सर्व सेलिब्रिटी मिशोच्या मेघा ब्लॉकबस्टर सेलचे प्रमोश करताना दिसत आहेत. या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, हा व्हिडिओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओवर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत ​​आहेत.

ही जाहिरात मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलची असून त्यात बॉलिवूडचे पॉवर कपल रणवीर-दीपिकासह कॉमेडियन कपिल शर्मा, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि रोहित शर्मा एकत् दिसत आहेत. या जाहिरातीत हे सर्व सेलिब्रिटी मिशोचे प्रोडक्ट आणि त्यावरील डिस्काउंटची माहिती देताना दिसत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी या सर्व सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकांउंडवरून मेगा ब्लॉकबस्टरचे पोस्टर्श शेअर केले होते. तसेच ट्रेलर 4 तारखेला रिलीज होईल अशी माहिती दिली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये हा नवा सिनेमा तर नाही ना अशी उत्सुकता निर्माण झाली होती.

विशेषत: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी हे पोस्टर्स शेअर केल्याने चाहत्यांना हे मेगा ब्लॉकबस्टर नेमके आहे तरी काय याबाबत उत्सुकता लागली होती. आज अखेर त्याचे उत्तर मिळाले आहे. हा कोणताही सिनेमा नसून ती मिशोच्या एका डिस्काउंट सेलची जाहिरात आहे.

या जाहिरातीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हे सर्व सेलिब्रिटी मिशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलचे प्रमोशन करताना दिसत आहे. मिशोने या जाहिरातीसाठी अगदी नवीन पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे ही यूनिक जाहित असल्याच्या कमेंट यूजर्स करत आहेत. या जाहिरातीत मिशोने बॉलिवडचे आघाडीचे सेलिब्रिटी दीपिका आणि रणवीरसोबत, टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा कपिल शर्मा आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांचा समावेश केला आहे. एकंदरित सर्व प्रकारच्या प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याची मिशोची ट्रीक यशस्वी होताना दिसत आहे. हे मोठे स्टार्स एका जाहिरातीसाठी एकत्र आल्यावर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने आतापर्यंतची सर्वात मोठी मल्टीस्टारर जाहिरात असल्याची कमेंट केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -