Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांचा हल्ला, पाचजण गंभीर जखमी

कोल्हापूर: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांचा हल्ला, पाचजण गंभीर जखमी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बांबवडे : सुपात्रे (ता. शाहूवाडी) येथील गाव तलावात गौरी व गणपती विसर्जनासाठी गेलेल्या महिला व बालकांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने चार लहान मुलांसह एक महिला गंभीर जखमी झाली.

सोमवारी गौरी-गणपती विसर्जन असल्याने सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान सुपात्रे गावातील महिला, लहान मुले यांच्यासह गावातील प्रौढ गौरी गणपती विसर्जनासाठी गावच्या तलावाच्या ठिकाणी गेले होते. यावेळी फटाक्या आवाज व धूर याने मधमाश्या पोळ्यावरून उठल्या व त्य सर्व जमावावर हल्ला केला. यामध्ये आठ ते अकरा वयोगटातील चार मुले व एक महिला गंभीर जखमी झाल या पाच गंभीरसह जमावातील ३५ जणांना मधमाश्यांनी चावा घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -