Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरपन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांना पाळला बंद

पन्हाळ्यात बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप; नागरिकांना पाळला बंद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पन्हाळ्यातील व्यवसायिक व नागरिक यांच्याबद्दल बाहेरील संघटनांचा हस्तक्षेप होत असलेच्या निषेधार्थ संपूर्ण पन्हाळा आज बंद राहिला. पन्हाळ्यावरील व्यावसायिक व नागरिक तसेच पन्हाळा गडासंदर्भात सोशल मिडियावरुन व प्रत्यक्ष धमकावणे या त्रासाला कंटाळून सर्व गावाने एकत्र येत उस्फूर्तपणे बंद
पाळला.



पावसामुळे पन्हाळ्यावरील बुरुज आणी तटबंदी ढासळत आहेत. त्याचे विकृत चित्रीकरण करुन सोशल मिडियावर टाकत पन्हाळाच्या नागरिकांवर टीका-टिप्पणी केली जाते. त्याचबरोबर एका अतिरेकी संघटनेच्या लोकांनी लंडन बसला हे नांव नको म्हणून नावे उपटुन काढली. यामुळे पन्हाळ्यावरील वातावरण तापले. याबाबत नागरिकांनी पोलिस, नगरपरिषद, तहसीलदार यांना निवेदन दिले होते, पण याची दखल घेतली नसल्याने पन्हाळा बंद ठेवून सव । शासनाचा निषेध केला. बंदमुळे आज पर्यटनासाठी आले पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -