ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : दौलतनगर परिसरातील गुंड चिन्या उर्फ संदीप अजित हळदकर (वय २५) याचा १२ जणांनी पाठलाग करून यादवनगरात दगडाने ठेचून निघृण खून केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली, आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले असून त्याचा शोध सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा दारूच्या नशेत दोन महिलांना चाकूचा धाक दाखवल्यानंतर संतप्त जमावाने त्याचा खून केल्याचे उघड झाले.
अटक केलेल्यांची नावे, महेश मधुकर नलवडे (२३, रा. सायबर चौक), अभिषेक राजेंद्र म्हेत्तर (२२), रोहन कृष्णात पाटील (२४), शुभम दीपक कदम (२२), अजय संजय कवडे (२८), सुधीर तुकाराम मोरे (२१, पाचही रा. दौलतनगर). तर दादू पवार (रा. दौलतनगर) हा संशयित पसार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंड चिन्या हळदकर याच्या गुन्हेगारीला दौलतनगरमधील नागरिक वैतागले होते. शनिवारी रात्री अकराला त्याने गांजा व दारूच्या नशेत दौलतनगर परिसरात घरांच्या दारावर लाथा मारल्या, रिक्षाची मोडतोड केली, महिलांच्या अंगाला चाकू लावून दहशत माजविली. या कृत्यामुळे संतप्त तरुणांची त्याच्याशी वादावादी झाली. एका महिलेने तक्रारीसाठी राजारामपुरी पोलिसांकडे धाव घेतली. तरुणांशी वाद वाढल्याने तो पळन गेला.
कोल्हापूर: महिलांची छेड काढल्यानेच जमावाकडून चिन्याचा खून, सहाजणांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -