Sunday, July 27, 2025
Homeराजकीय घडामोडीराज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी, लाइव्ह पाहता येणार!

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी, लाइव्ह पाहता येणार!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिवसेनेमध्ये (Shivsena) सुरु असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुळ शिवसेना शिंदे गटाची की, ठाकरे गटाची असा वाद सध्या सुरु आहे. यासोबतच दोन्हीही गटांकडून विविध याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आल्या आहे. या सर्व याचिकांवर आज एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. महत्वाचे म्हणजे आता घटनापीठाच्या सर्व सुनावण्या लाईव्ह पाहता येतील. यामुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आजची सुनावणी लाइव्ह होईल.



एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत हात मिळवणी करुन आपले सरकार स्थापन केले. दरम्यान शिवसेनेचे दोन गट पडल्याने खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरु झाला. यावरील सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होईल. यासोबतच महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा देखील स्पष्ट होऊ शकतो. राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांरांच्या अधिकारांवर देखील सर्वोच्च न्यायालय सुनावणी करण्याची शक्यता आहे. पक्षांतरबंदी कायद्यावरही सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे.

ठाकरे गट पुरावे सादर करु शकते
शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेने विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. यासाठी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर केले जाऊ शकतात. शिंदेंनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर बंड केलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली जावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे. यासोबतच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी होईल. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ आहे. यामध्ये न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी हे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -