Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : बनावट मालाचा साठा करणाऱ्या गांधीनगरातील दुकानावर छापा

Kolhapur : बनावट मालाचा साठा करणाऱ्या गांधीनगरातील दुकानावर छापा

नायकी, जॉर्डन व अंडर आर्मर या कंपनीच्या बनावट हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट यांचा साठा विक्रीच्या हेतूने केल्याबद्दल गांधीनगर मेन रोडवरील डिवाइन बरमोडा या दुकानावर छापा टाकून ६८ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकानमालक सागर सुरेश चावला (वय २८, रा.गांधीनगर) यांच्यावर स्वामित्व कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नायकी, जॉर्डन व अंडर आर्मर या बँडची बनावट उत्पादने मूळ कंपनीची आहेत असे भासवून विक्रीसाठी सागर चावला यांनी साठा केला होता. जप्त केलेला बनावट माल असा : हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट, नग २२३, किंमत २२ हजार ३०० (जॉर्डन), नायकी कंपनीच्या बनावट हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट नग २७२, किंमत २७ हजार २००, अंडर आर्मर कंपनीच्या हाफ पॅन्ट व ट्रॅक पॅन्ट, नग १८६, किंमत १८ हजार ६००. तिन्ही कंपनीचे एकूण नग ६८१, एकूण किंमत ६८ हजार १००. या कंपन्यांचे अंमलबजावणी अधिकारी महेश विष्णू कांबळे (रा. सुखदेव विहार, मथुरा रोड, नवी दिल्ली, मूळ रा. जनवाडी, शिवाजीनगर पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असून हा बनावट माल गांधीनगर पोलिसांनी जप्त केला. डिवाइन बरमोडाचे मालक सागर सुरेश चावला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा प्रथम अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला आहे. पोलीस नाईक दिलीप दळवी अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -