Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगराजकीय पक्षाची व्याखा काय? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा मोठा सवाल

राजकीय पक्षाची व्याखा काय? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा मोठा सवाल

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर कामकाज सुरू झालं आहे. सुप्रीम कोर्टातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. राजकीय पक्षाची व्याखा काय? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने मोठा सवाल उपस्थित केला आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, पक्षादेश डावलला तर पक्षाला कारवाईचा अधिकार आहे. ‘अपात्रतेचा पक्षचिन्हावर कसा परिणाम होईल?’ असा सवाल सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल यांना केला आहे. ‘मूळ सेना तुमची मग व्हीप का पाळला नाही’?, ‘एकनाथ शिंदे कोणत्या अधिकारात आयोगाकडे गेले’? ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सवाल केला. आयोगाच्या कामकाजाबाबत स्पष्टता यावी, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा कौल नाही, असंही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -