Tuesday, July 29, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार

कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम


दसरा चौकात होणारया शाही दसरा सोहळय़ाला ऐतिहासिक परंपरा आहे. अशा पद्धतीचा सोहळा देशातील ठराविक राज्यातच होतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुरु केलेली ही वैभवशाली परंपरा राज्यभरातील जनतेसमोर नेण्यासाठी कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टीवल करणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच या शाही दसरयातील सोहळय़ात शासनाच्या सहभागास परवानगी देण्यासाठी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहे. म्हैसुरच्या धर्तीवर कोल्हापुरचा दसरा सोहळाही भव्य स्वरुपात करण्याच प्रयत्न असणार आहे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.



पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -