Monday, August 4, 2025
Homeक्रीडाआज भारत- पाकिस्तानमध्ये रंगणार मुकाबला, जाणून घ्या कधी, कुठे पाहायचे लाइव्ह स्ट्रीमिंग!

आज भारत- पाकिस्तानमध्ये रंगणार मुकाबला, जाणून घ्या कधी, कुठे पाहायचे लाइव्ह स्ट्रीमिंग!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महिला आशिया चषक स्पर्धेत 7 ऑक्टोबर म्हणजे आज भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तानच्या महिला संघाशी मुकाबला करणार आहे. बांगलादेशमध्ये हा सामना (IND W Vs PAK W) रंगणार आहे. मागील सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंना संधी देऊनही सहज विजय मिळवणारा भारत आज महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी मजबूत संघासह उतरणार आहे.



भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याबाबत नेहमीच उत्सुकता असते. मात्र यावर्षी आतापर्यंत या दोन संघांमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने सहज विजयाची नोंद केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या शेवटच्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, मार्चमध्ये दोन्ही संघांमध्ये जबरदस्त सामना रंगला होता. विश्वचषक आणि अलीकडेच जुलै 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन्ही संघ एकमेकांशी भिडले. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -