Friday, December 19, 2025
Homeब्रेकिंगशिंदे गटालाही हवा त्रिशूळ आणि उगवता सूर्य… उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चिन्हांवरही...

शिंदे गटालाही हवा त्रिशूळ आणि उगवता सूर्य… उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या चिन्हांवरही एकनाथ शिंदेंनी केला दावा

ठाकरे गटाच्या (Thackeray Gut) पाठोपाठ आता शिंदे गटाने (Shinde Gut) देखील निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तीन चिन्हांचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. पण आता शिंदे गटाकडूनही (Shinde Group) तीन चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा असा तीन चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळे पुन्हा ठाकरे गट आणि शिंदे गटात नवा सामना रंगण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग दोन्ही गटांना कोणते निवडणूक चिन्ह देते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाची हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला…
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाने युक्तिवाद करण्यास संधी न दिल्याने ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्याचं समजतं. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिंदे गटाने या याचिकेतून केली आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाकडे दस्ताऐवज सादर करण्याचं काम सुरू केलं आहे. ठाकरे गटाने दिलेल्या नव्या चिन्हाबाबत वकील निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडत आहे. अशात शिंदे गटाने देखील त्रिशूळ, उगवता सूर्य या चिन्हांवर दावा केला आहे. याबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे. आता त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेते, याक़डे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आधी केला होता धनुष्यबाणावर दावा…

दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. रविवारी एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये निवडणूक चिन्हाबाबत चर्चा झाली. शिंदे गटामध्ये तलवार, गदा आणि तुतारी या तीन चिन्हांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच धनुष्यबाण आपल्याला मिळणार असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला होता. मात्र, सोमवारी शिंदे गटाने त्रिशुळ, उगवता सूर्य आणि गदा अशा तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -