राज्याच्या राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात एकीकडे शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाचा संघर्ष सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठा निर्णय (Raj Thackeray big decision) घेतला आहे. राज्यातील आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढेल अशी महत्त्वाची घोषणा (Raj Thackeray announcement) राज ठाकरे यांनी केली आहे. मनसे (MNS) अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निषाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल हा भ्रम असल्याचे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे. तसेच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करतानाचा राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि स्वबळाचा नारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या नेतृत्त्वात मुंबईतील ‘रंगशारदा’मध्ये आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी आपण आगामी निवडणुकांत स्वबळावर लढणार असून त्याच्या तयारीला लागा असे आदेस मनसैनिकांना दिले आहेत. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करु असे देखील ते कार्यकर्त्यांना म्हणाले. सध्या सुरु असलेल्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत. लोकांना आता पर्याय हवा आहे आणि त्यासाठी लोक आपला विचार करतील असे राज ठाकरे म्हणाले. या दृष्टीने सकारात्मक विचार ठेवून निवडणुकीला सामोरे जाऊ, आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचे आहे असे राज ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले.
दरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करु शकते अशी चर्चा होती. दरम्यानच्या काळात काही भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. मनसे-भाजप युती होणार असे चिन्ह दिसत असताना राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मनसेच्या बैठकीत राज ठाकरे म्हणाले, जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागतील, आपल्याकडे आता पाच महीने आहेत. तसेच त्यासाठी कार्यकर्त्यांनी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर देखील यावेळी राज ठाकरेंनी टिका केली. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा लाखो लोकांनी पाहिलाच नाही असा दावा यावेळी राज ठाकरेंनी केली. मनसेला आगामी निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवायचं आहे, विजयापर्यंत कसं घेऊन जायचं ती जबाबदारी माझी असे राज ठाकरे म्हणाले. मी तुम्हाला विधानसभेत सत्तेतील आमदार आणि लोकसेभत सत्तेत खासदार म्हणून बसवणार आहे. यासाठी तुम्ही केवळ सकारात्मक विचार ठेवा असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.