Monday, August 4, 2025
Homeतंत्रज्ञाननवे सिमकार्ड, बॅंक खातं उघडण्याचे नियम बदलणार..?, असे असणार नवे नियम..

नवे सिमकार्ड, बॅंक खातं उघडण्याचे नियम बदलणार..?, असे असणार नवे नियम..

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी केंद्र सरकार सिमकार्ड व बँकिंग क्षेत्रांतील नियम अधिक सक्तीचे करण्याच्या विचारात आहे. सध्या याबाबत चर्चा सुरू असून, लवकरच नवी नियमावली जाहीर केली जाऊ शकते..

केंद्रीय गृह मंत्रालयाने या विषयावर वित्त मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार व दूरसंचार मंत्रालयासोबत नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात नवीन सिमकार्ड जारी करणं, तसेच बॅंकेत नवीन खातं उघडण्यावर काही निर्बंध घालण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

काय बदल होणार..?

– सध्या फक्त आधारकार्ड व्हेरिफिकेशनवर सिमकार्ड व नवीन खातं उघडता येतं.. मात्र, टेलिकॉम ऑपरेटर व बँकांसाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’चा नियम अनिवार्य केला जाऊ शकतो.

– नवीन सिमकार्ड देताना, तसेच बॅंकेत नवीन खातं उघडता ‘केवायसी’ची सक्ती केली जाऊ शकते. त्यासाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ आवश्यक केले जाऊ शकते.

– कंपन्यांचं खाते इनकाॅर्पोरेशन सर्टिफिकेटवर उघडलं जातं. मात्र, या सगळ्या गोष्टी फिजिकल ‘केवायसी’ केल्याशिवाय सुरू होऊ नयेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -