Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Breaking : ठाकरे गटाच्या बोगस शपथपत्राबाबत तपास सुरु, कोल्हापुरात Mumbai Crime...

Kolhapur Breaking : ठाकरे गटाच्या बोगस शपथपत्राबाबत तपास सुरु, कोल्हापुरात Mumbai Crime Branch टीम दाखल

उध्दव ठाकरे यांच्या समर्थनाथ ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली साडे चार हजार शपथपत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर पोलीस यंत्रणेने तपास सुरु केला आहे. मुंबई गुन्हे शाखेची चार पथक मुंबई, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये पोहचली आहेत. कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात ही टीम पोहचली असून तपास सुरु करण्यात आला आहे. शपथपत्रातील माहिती खरी की खोटी याची चोकशी करण्यात येणार आहे.

मिळाललेल्या माहितीनुसार मुंबई गुन्हे शाखेची पाच जणांची टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे. कोल्हापुरातून सात हजार शपथपत्र पाठवण्यात आली आहेत. ही शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहेत. मात्र शिंदे गटाने शपथपत्र बोगस असल्याचा आरोप केल्यामुळे ही शपथपत्र खरी की खोटी याची तपासणी केली जाणार आहे.

मुंबईच्या निर्मला नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यानुसार आम्ही कोल्हापुरात आलो आहोत. कोल्हापुरातून चौदाशे ते पंधराशे प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत. त्याचा तपास आम्ही करणार आहोत, अशी माहिती मुंबई क्राईम ब्रैंच अधिकारी दीपक सावंत यांनी दिली आहे.

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे गोठवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जाहीर केला.निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर करण्याआधी दोन्ही गटांनी शपथपत्रे सादर केली होती. यात शिंदे गटाने ७ लाख तर ठाकरे गटाने अडीच लाख शपथपत्रे सादर केली. दरम्यान, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेली साडे चार हजार शपथपत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.स्टॅम्प पेपरचा वापर करून नोटरी करणाऱ्यांनी शपथपत्रे बनवल्याचा दावा करण्यात आला आहे. चुनाभट्टी येथील संजय कदम यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली आहे.पोलिसांनी मुंबईत ४ हजार ६८२ शपथपत्रे जप्त केली आहेत.याप्रकरणी निर्मलनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

वांद्र्यातील एका दुकानात नोटरी तयार केली जात होती तिथे शपथपत्रांचा गट्ठा सापडला.त्या शपथपत्राचा मायना तयार होता.इतर लोकांचे आधार कार्ड आणि माहिती घेऊन शपथपत्रे तयार करण्यात येत होती.शपथपत्राची प्रक्रिया ही नोटरी अधिकाऱ्यासमोर करावी लागते.मात्र प्रक्रियेनुसार शपथ . तयार न केल्यानं ती बनावट असल्याचा आरोप शिंदे गटान कला आहे.वांद्रे आणि माहिम भागात बनावट शपथपत्रे जप्त केली असल्याचे शिंदे गटाचे समर्थक नरेश म्हस्के यांनी माहिती दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -