Friday, November 22, 2024
Homeक्रीडाभारताची स्टार थालीफेकपटू कमलप्रीत कौरवर 3 वर्षांची बंदी!

भारताची स्टार थालीफेकपटू कमलप्रीत कौरवर 3 वर्षांची बंदी!

भारताची स्टार ऑलिम्पिक थाळीफेकपटू कमलप्रीत कौर (India’s discus thrower Kamalpreet Kaur) अडचणीत आली आहे. जागतिक अथलेटिक्सच्या अथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंद घातली आहे. एआययूने बुधवारी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. त्यामुळे कमलप्रीत कौरला मोठा धक्का बसला आहे. एआययूने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, पंजाबमधील 26 वर्षीय खेळाडूवर तिच्या नमुन्यात प्रतिबंधित पदार्थ (स्टेनोझोलॉल) आढळल्यामुळे किंवा तिने तो पदार्थ वापरल्यामुळे तिच्यावर बंद घालण्यात आली आहे.

एनआययूने आपल्या निवेदनात असे देखील सांगितले आहे की,
कमलप्रीत कौरचा नमुना यावर्षी 7 मार्च 2022 रोजी पटियाला येथे घेण्यात आला होता. त्यानंतर हा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला असता टेस्ट रिपोर्टमध्ये स्टेनोझोलॉलचे अंश आढळून आले आहेत. कमलप्रीत कौरवर बंदी घाल्यामुळे आता तिला पुढील तीन वर्षे कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही. कमलप्रीत कौरवरील ही बंदी 29 मार्च 2022 पासून लागू करण्यात आली आहे. तसंच 7 मार्चनंतर कमलप्रीत कौर कोणत्याही कार्यक्रमात सहभागी झाल्याचा निकाल विचारात घेतला जाणार नाही. एआययूने 29 माार्च रोजी कमलप्रीत कौरचे तात्पुरते निलंबन केले होते. पण आता कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एआययूने जाहीर केला आहे. त्यामुळे ती अडचणीत सापडली आहे.

कमलप्रीतच्या टेस्ट रिपोर्टमध्ये आढळून आले होते की, तिने फेब्रुवारी 2022 मध्ये प्रोटीन सप्लिमेंटचे दोन स्कूपचे सेवन केले होते. ज्यामध्ये स्टॅनोझोलॉलचे अशं आढळून आले होते. दरम्यान, कमलप्रीत कौरने टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कमलप्रीतने पात्रता फेरीमध्ये 64 मीटर लांब थाळीफेक केली होती. 31 खेळाडूंच्या यादीमध्ये कमलपीत कौर दुसऱ्या क्रमांकावर होती. अंतिम फेरीमध्ये तिला मेडलची अपेक्षा होती पण तिला ते मिळवण्यात यश आले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -