Sunday, July 6, 2025
Homeनोकरीनोकऱ्यांचा महापूर..! ‘एसएससी’मार्फत तब्बल 73,333 पदांसाठी भरती

नोकऱ्यांचा महापूर..! ‘एसएससी’मार्फत तब्बल 73,333 पदांसाठी भरती

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी निवड आयोगामार्फत (स्टाफ सिलेक्शन कमिशन) पुढील काही दिवसांत तब्बल 73,333 पदांसाठी (SSC Recruitment 2022) भरती केली जाणार आहे. सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

‘एसएससी’मार्फत 2022 मध्ये 73,000 हून अधिक पदांची भरती होणार आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग, संस्था व मंत्रालयांमधील गट ‘क’ आणि ‘ड’ची रिक्त पदे भरली जातील. या विभागातील रिक्त पदांचा तपशील आयोगाकडे पाठवला आहे.

गृह मंत्रालयाच्या अखत्यारित 28000 हून अधिक पदे, तर दिल्ली पोलिसांमध्ये सुमारे 7550 पदे आयोगामार्फत भरायची आहेत. तसेच, मल्टी टास्किंग स्टाफ भरती, सीजीएल भरती, जीडी कॉन्स्टेबल भरती व इतर भरतीचा यामध्ये समावेश आहे.

जीडी कॉन्स्टेबल भरतीअंतर्गत 24,605, ‘सीजीएल’ भरतीअंतर्गत 20,814, दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल भरती अंतर्गत 6433, मल्टी टास्किंग स्टाफ भरती अंतर्गत 4682, सबइन्स्पेक्टर सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशन अंतर्गत 4300 आणि इतर विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -