Saturday, July 5, 2025
Homeतंत्रज्ञानखुशखबर! ‘या’ कंपनीचे 2 नवीन रिचार्ज प्लॅन्स लॉंच, वाचा ढीगभर फायदे..

खुशखबर! ‘या’ कंपनीचे 2 नवीन रिचार्ज प्लॅन्स लॉंच, वाचा ढीगभर फायदे..

भारतातील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन नुकतेच लॉंच केले आहेत. याद्वारे फ्री कॉलिंग आणि आणखी बरेच फायदे ग्राहकांना मिळणार आहे. या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊ..

▪️ बीएसएनएल (BSNL) कंपनीने दोन नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. त्यात 269 रुपये आणि 769 रुपये किंमतीचे असे दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स आहेत.

▪️ BSNLच्या या प्रीपेड रिचार्ज प्लानची वैधता: 269 रुपये किंमतीच्या रिचार्जची 30 दिवस व 769 रुपये किंमत असणाऱ्या प्लॅनची 90 दिवसाची वैधता आहे.

▪️ कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय दररोज 100 SMS चा लाभ मिळणार आहे.

▪️ ग्राहकांना इंटरनेट वापरासाठी दररोज 2 GB डेटा या प्लॅन्समध्ये मिळणार आहे.

▪️ याशिवाय मनोरंजनासाठी चॅलेंजस एरेना गेम्स, Eros Now Entertainment, Lystn पॉडकास्ट सर्विसेज, हार्डी मोबाइल गेम सर्विसेज, लोकधुन आणि Zing चा ॲक्सेस मिळणार आहे.

▪️ या प्लॅन्स अंतर्गत कंपनी ग्राहकांना BSNL Tunes ची देखील ऑफर देते. जेणेकरून तुमचं आवडतं गाणं तुम्ही Caller Tune म्हणून ठेवू शकता. महत्वाचं म्हणजे ही ट्यून तुम्ही कित्येक वेळाही बदलू शकणार आहात, त्यावर कोणतीही मर्यादा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -