Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरपाच दिवसांत 317 प्रवाशांचा प्रवास; कोल्हापूर- मुंबई विमानसेवेला प्रतिसाद

पाच दिवसांत 317 प्रवाशांचा प्रवास; कोल्हापूर- मुंबई विमानसेवेला प्रतिसाद

अडीच वर्षे खंडित झालेली कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा 4 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे. स्टार एअरवेजकडून सुरु करण्यात आलेली ही विमानसेवा सद्या आठवडय़ातील तीन दिवस आहे. पण या विमानसेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून पाच दिवसात 317 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

कोल्हापूर-मुंबई मार्गावर यापूर्वीही विविध कंपन्यांकडून विमानसेवा सुरु करण्यात आली. केंद्र शासनाच्या उडाण योजनेतून ही सेवा सुरु होती. पण तांत्रिक कारण आणि मुंबई विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने विमानसेवा खंडित झाली. यामुळे व्यापारीव्यावसायिकातून नाराजी व्यक्त होत होती. विविध संस्थासंघटनांनी कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान उडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया, मुख्यमंत्री यांना भेटून मागणी केली होती. तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील यांनी पाठपुरावा केला.

या सर्वांच्या प्रयत्नामुळे अखेर 4 ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई मार्गावर विमानसेवेला प्रारंभ झाला. स्टार एअरवेजकडून ही सेवा सुरु करण्यात आली असून आठवडय़ातील तीन दिवस उडाण होत आहे. गेल्या पाच दिवसात स्टार एअरवेजची एकूण 10 उडाणे झाली असून 317 प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबईहून 149 प्रवासी कोल्हापूरात आले आहेत. कोल्हापूरातून 168 प्रवासी मुंबईला गेले आहेत. भविष्यात प्रवाशांच्या या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

आठवडय़ातील सात दिवस उड्डाणासाठी प्रयत्नमुंबई मार्गावर स्टार एअरवेजकडून सुरु करण्यात आलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक उडाणावेळी सरासरी 30 ते 35 प्रवासी आहेत. यामुळे आठवडय़ातील सात दिवस विमानसेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आटवडय़ातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सेवा मुंबईतून सकाळी 10.30 टेक ऑफ कोल्हापूरात सकाळी 11.20 वाजता लँडिंग

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -