Sunday, July 6, 2025
Homeराजकीय घडामोडीअंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा!

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार, ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा!

अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे सांगितले की, ‘भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेत आहोत, तसेच मुरजी पटेल (murji patel) अपक्षही निवडणूक लढणार नाहीत.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध व्हावी यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मागणी केली होती. सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्यापाठोपाठ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ही निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी केली होती. यासर्व राजकीय नाट्यानंतर भाजप नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर भाजपकडूवन याबाबत बैठक घेण्यात आली आणि बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे उमेदवार मुरली पटेल माघार घेत असल्याची घोषणा केली.

भाजपचे उमेदवार मुरली पटेल यांनी माघार घेतल्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या बैठकीनंतर ‘शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत विजयी होतील.’, असा विश्वासही चंद्रशेखअर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसंच, मुरली पटेल हे अपक्ष देखील निवडणूक लढवणार नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -