Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंग१४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने मारली माजी, शिंदे गटाला केवळ

१४ ग्रामपंचायतींसह शिवसेनेच्या ठाकरे गटाने मारली माजी, शिंदे गटाला केवळ

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भिवंडी : – भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने १४ ग्राम पंचायती जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाकडे अवघी घोडगाव हि एकमेव ग्राम पंचायत आली असल्याने शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील,आमदार शांताराम मोरे यांना हि या निवडणुकीतील अपयशाला सामोरे जावे लागले आहे.तर भाजपाने अवघ्या सात ठिकाणी सरपंच पदाची निवडणूक जिंकली आहे.



गोरसई,सावंदे,मोहंडूळ,अंबाडी,चाणे,गणेशपुरी,खडकी बुद्रुक,दाभाड,पालखणे,मालबिडी,मौंदे,पिळंझे,सुपेगाव,चिंबी पाडा या १४ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. या ग्राम पंचायत निवडणुकीत मनसेने आपले खाते उघडले असून शिरोळे व दिघाशी या दोन ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विजय संपादन केला. तर कवाड,गाणे, पारीवली,पाच्छापूर,वेढे,खरीवली, पिंपळघर याठिकाणी भाजपाने यश मिळविले आहे.

कामतघर येथील वऱ्हाळमाता मंगल भवन येथे सकाळी १० वाजता मतमोजणीस तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरुवात करण्यात आली होती. दुपारी एक वाजता ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली उपजिल्हाधिकारी जनार्दन कासार यांनी यावेळी निरीक्षक म्हणून या मतमोजणी वर लक्ष ठेवले होते.

एकुण ग्रामपंचायत- ३१
शिवसेना – १४
शिंदे गट – ०१
भाजप – ०७
राष्ट्रवादी – ००
काँग्रेस – ००
इतर – ०७ मनसे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -