Monday, August 4, 2025
Homeराजकीय घडामोडीआज काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष, 24 वर्षांनंतर बदलणार इतिहास!

आज काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष, 24 वर्षांनंतर बदलणार इतिहास!

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज म्हणजेच बुधवारी मतमोजणी होणार आहे. यासोबतच 24 वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील एखाद्या नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. आज काँग्रेसची कमान मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हातात राहणार की शशी थरूर यांच्या हातात राहणार हे निश्चित होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी काँग्रेस मुख्यालयातच होणार असून दुपारपर्यंत काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे.

सोमवारी झाले होते मतदान
या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर अनेक ज्येष्ठ नेत्यांसह सुमारे 9500 प्रतिनिधींनी (निर्वाचक मंडळाचे सदस्य) सोमवारी नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान केले होते. 9900 मधील 9500 प्रतिनिधींनी मतदान केले. सोमवारी सुमारे 96 टक्के मतदान झाले. गांधी घराण्याशी जवळीक आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असली तरी शशी थरूर यांच्यामुळे ही लढत चुरशीची झाली आहे. थरूर हे खर्गेंना धक्का देखील देऊ शकतात.

मल्लिकार्जुन खर्गे किंवा शशी थरूर यांच्यापैकी एकाच्या विजयाने एक नवा इतिहास रचला जाईल. कारण या निवडणुकीमुळे 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरचा नेता देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडला जाणार आहे. याआधी सीताराम केसरी हे बिगर गांधी अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली आहे. अध्यक्षपदासाठी 1939, 1950, 1977, 1997आणि 2000 मध्ये निवडणुका झाल्या आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीनंतर 24 वर्षांनी गांधी घराण्याबाहेरील नेत्याची देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे.

खर्गे आणि थरुर यांच्यात टक्कर


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांच्यात लढत आहे. दोन्ही बाजूचे 5-5 एजंट मतमोजणीवर देखरेख ठेवतील, तर दोन्ही बाजूचे 2 एजंट राखीव ठेवण्यात येतील. दरम्यान खर्गे यांचा दावा प्रबळ मानला जात आहे. यावेळी काँग्रेस मुख्यालयात दोन्ही पक्षांच्या समर्थकांची गर्दी देखील जमू शकते. या दोघांमधून कोणाची निवड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -