टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आज भारताचा दुसरा सराव सामना होणार आहे. मागील सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 धावांनी विजय मिळवल्यानंतर आता भारताला आपल्या गोलंदाजीवर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादव आणि के. एल. राहुलला आजच्या सामन्यात विश्रांती मिळू शकते.
भारताविरुद्ध खेळताना न्यूझीलंड हा एक मजबूत संघ आहे, याचे उदाहरण कित्येकदा आपण पाहिले आहे. T-20 Worldcup स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी हा संघ चांगली लढत देऊ शकतो. अशात भारताला त्यांच्याविरुद्ध खेळल्यानंतर स्वतःची गुणवत्ता समजू शकणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 वर्ल्ड कपमधील सराव सामना आज दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. मॅच सुरू होण्याच्या अर्धा तास आधी टॉस होईल. सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी प्लस हॉटस्टार वर पाहता येणार आहे.
भारत संभाव्य संघ: रोहित शर्मा, के एल राहुल/दीपक हुडा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव/ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
न्यूझीलंड संभाव्य संघ: फिन ॲलन, मार्टिन गुप्टिल, केन विलियम्सन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मायकल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, ॲडम मिल्न, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी.