Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : शिरोळमधील शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटात; मुख्यमंत्र्याची घेतली भेट

Kolhapur : शिरोळमधील शिवसेनेचा मोठा गट शिंदे गटात; मुख्यमंत्र्याची घेतली भेट

माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या उपस्थितीत शिरोळ तालुक्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला समर्थन जाहीर करून जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्व शिवसैनिकांचे स्वागत केले. खासदार संजय मंडलिक व संजय पाटील- यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.

बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला पाठिंबा जाहीर केलेल्या या कार्यकर्त्यांमध्ये माजी शिरोळ तालुका प्रमुख सतीश मलमे, उदय झुटाळ, रतन पडियार, जुगल गावडे, सुरज भोसले, संभाजी गोते, अशोक शिंगाडे, सचिन डोंगरे व दादासो नाईक यांचा समावेश असून त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

“मागील अडीच वर्ष आपण माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील
यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात सक्रिय राहून काम केले आहे. या पुढच्या काळात आपण ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हा पक्ष तळागाळात पोहचवण्यासाठी ताकतीने काम करत राहू’ असे सतीश मलमे यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -