सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे. NTPC ने अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी (EET) रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत संकेतस्थळावर (ntpc.co.in) अर्ज करू शकतात. 11 नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये या भरती प्रक्रियेंतर्गत एकूण 864 पदे भरली जाणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ ntpc.co.in
वर जाऊन किंवा https://www.ntpc.co.in/ या लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, NTPC Recruitment 2022 अधिसूचना PDF या लिंकवर क्लिक करून, तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता.
एकूण पदे
864 पदे भरली जाणार आहे.
अर्ज करण्याची तारीख – 28 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2022
शैक्षणिक पात्रता
NTPC च्या अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या संबंधित विषयांमध्ये उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 27 वर्षे असावी.
काय आहे NTPC?
NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही देशातील 7 महारत्न कंपन्यांपैकी एक सरकारी कंपनी आहे. वीज निर्मिती करणारी ही एक मोठी कपंनी आहे. 1975 मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. NTPC च्या सर्व वीजनिर्मिती केंद्रची क्षमता ही 41,794 मेगावॅट इतकी आहे. जी देशातील एकूण वीजनिर्मितीच्या जवळापास 18 टक्के आहे.