Sunday, July 27, 2025
Homeक्रीडाटी-20 वर्ल्ड कप : सेमीफायनल, फायनलच्या नियमांत मोठे बदल, ‘आयसीसी’कडून महत्वपूर्ण घोषणा..

टी-20 वर्ल्ड कप : सेमीफायनल, फायनलच्या नियमांत मोठे बदल, ‘आयसीसी’कडून महत्वपूर्ण घोषणा..

सध्या ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरु आहे. सेमी फायनलमध्ये पोचण्यासाठी प्रत्येक संघ एक एक पाॅईंट मिळवण्यासाठी जिवाची बाजी लावून खेळतोय.. दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतही रंगाचा भंग होत आहे. पावसामुळे अनेक संघांना फटका बसला आहे.

‘आयसीसी’च्या नियमानुसार टी-20 सामन्यात दोन्ही संघांनी किमान पाच ओव्हर खेळल्यास, डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात येतो. मात्र, या नियमाचाही काही संघांना फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पावसाची शक्यता लक्षात घेऊन, ‘आयसीसी’ने सेमी फायनल व फायनलसाठी या नियमात मोठा बदल केला आहे.

‘आयसीसी’चा नवा नियम..

टी-20 वर्ल्डकपमध्ये पहिली सेमी फायनल सिडनीमध्ये 9 नोव्हेंबरला, तर दुसरी सेमी फायनल 10 नोव्हेंबरला अ‍ॅडिलेडमध्ये होणार आहे, तसेच फायनल सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

‘आयसीसी’च्या नियमानुसार टी-20 सामन्यात दोन्ही संघ पाच पाच ओव्हर खेळल्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू होतो. मात्र, ‘आयसीसी’च्या नव्या निर्णयानुसार, दोन्ही संघांनी 10-10 ओव्हर्स खेळल्या, तरच डकवर्थ लुईस नियम लागू केला जाणार आहे. शिवाय, सेमी फायनल व फायनलच्या सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे.

फायनलमध्ये पाऊस आल्यास…

पावसामुळे सेमी फायनल किंवा फायनल मॅचमध्ये 10-10 ओव्हर्सचा खेळ न झाल्यास, दुसऱ्या दिवशी मॅच सुरु होईल. दुसऱ्या दिवशीही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर ग्रुप स्टेजमध्ये ‘नंबर वन’ असणारी टीम फायनलमध्ये जाईल. तसेच, पावसामुळे टी-20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना दोन्ही दिवशी झाला नाही, तर दोन्ही टीमला संयुक्त विजेते घोषित केलं जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -