Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाआज इंडिया विरुद्ध इंग्लंडमध्ये महामुकाबला: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहता...

आज इंडिया विरुद्ध इंग्लंडमध्ये महामुकाबला: जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पाहता येणार सामना!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

टी -20 वर्ल्डकप 2022 मधील दुसरा सेमीफायनलमध्ये आज टीम इंडिया आणि टीम इंग्लंडमध्ये महामुकाबला होणार आहे. टीम इंडिया आणि टीम इंग्लंडमध्ये हा सामना अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणारी टीम फायनलमध्ये टीम पाकिस्तानसोबत खेळणार आहे. त्यामुळे कोणती टीम फायनलमध्ये जाणार याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता असून या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.



टीम इंडियाने सुपर 12 फेरीतील 5 पैकी 4 सामने जिंकत सेमिफानलमध्ये धडक मारली आहे. तर टीम इंग्लंडने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत पण त्यांचा एक सामना अनिर्णीत राहिला होता. आजचा सामना दोन्ही टीमसाठी जास्त महत्वाचा राहणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही टीम तयारीत मैदानावर उतरणार आहे. हा सामना कधी, कुठे होणार आहे आणि तो कसा पाहता येणार याबद्दल आपण जाणून घेणार आहोत….
सामन्याची वेळ –
टीम इंडिया विरुद्ध टीम इंग्लंड याच्यातील सामना 10 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास आधी टॉस होणार आहे.
सामन्याचे ठिकाण –
हा सामना ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम (Adelaide Cricket Stadium) येथे होणार आहे.

याठिकाणी पाहा सामना –
या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग तुम्हाला पाहता येऊ शकते. तसंच डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे ते तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता.

अशा असतील दोन्ही टीम –
टीम इंडिया – रोहित शर्मा (कॅप्टन), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -