Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : संक्रांतीची सुगडी करताना एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कोल्हापूर : संक्रांतीची सुगडी करताना एकुलत्या एक मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

खुपिरे (ता. करवीर) येथे संक्रांतीच्या सुगडी तयार करतांना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला. प्रदीप जोतिराम कुंभार (वय २२) असे या युवकाचे नाव आहे.दुपारी १२च्या दरम्यान ही घटना घडली असून करवीर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी प्रदिपच्या वडिलांचे एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. घराची सर्व जबाबदारी प्रदीपच्या खांद्यावर असल्याने एमआयडीसी मध्ये नोकरी करत तो आईला कुंभार कामात मदत करत होता.संक्रांतीचा सण तोंडावर असल्याने या सणासाठी लागणारे सुगडी,मडकी करण्याचे काम सुरू होते. एमआयडीसीतील रात्रपाळीने काम करुन आलेला प्रदिप सकाळी विद्युत चाकावर चिखल थापून सुगडी करायला बसला होता. चाकावर चिखल ठेवताच त्याला विजेचा जोराचा धक्का बसल्याने तो ओरडला. प्रदिपच्या ओरडण्याच्या आवाजाने आई शोभा कुंभार व शेजाऱ्यांनी धाव घेतली. तातडीने प्रदिपला कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. पण उपचारापूर्वीच प्रदीपचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

प्रदीप हा एकुलता एक होता.वडीलांच्या मृत्यूनंतर एमआयडीसीत नोकरी करत तो कुंभार व्यवसाय सांभाळत घरची आर्थिक जबाबदारी सांभाळत होता. प्रदिपच्या पश्चात आई, दोन्ही बहिणी विवाहित आहेत. प्रदीप कष्टाळू व हरहुन्नरी युवक होता.अशा युवकाचा विजेच्या धक्याने दुर्देवी मृत्यू झाल्याचे समजताच गावात शोखकळा पसरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -