Saturday, July 26, 2025
Homeसांगलीमालगाव येथील बेपत्ता इसमाचा शेत तळ्यात सापडला मृतदेह

मालगाव येथील बेपत्ता इसमाचा शेत तळ्यात सापडला मृतदेह

मिरज तालुक्यातील मालगाव येथे एका इसमाचा शेत तळ्यात मृतदेह आढळून आला आहे.मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गणेश रघुनाथ गाडे हा मिसिंग असल्याची नोंद होती.गणेश गाडे हा ७ नोव्हेंबर २०२२ पासून बेपत्ता होता.या मयत व्यक्तीचे नाव गणेश रघुनाथ गाडे वय ३२ असे आहे.आज त्यांचा मृतदेह मालगाव येथील एका शेत तळ्यात आढळून आला. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.स्पेशल रेस्‍क्‍यु फोर्सला मिरज पोलिस स्टेशनला मधून फोन आला.

स्पेशल रेस्‍क्‍यु फोर्स घाटनस्थळी आली.तो मृतदेह बाहेर काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव रुग्णवाहीका मिरज यांच्या ॲब्युलन्स मधुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.या घटनेचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.तसेच यामध्ये विशेष बचाव दल स्पेशल रेस्‍क्‍यु फोर्स चे कैलास वडार शिवराज टाकळे,अमीर नदाफ,स्वप्नील धुमाळ,महेश गवाने,इम्रान मुजावर,महादेव रुग्णवाहीका ह्यांनी मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -