Sunday, February 22, 2026
Homeतंत्रज्ञानव्हॉट्सॲप व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड कसा करायचा, ‘हे’ ॲप येईल कामाला..

व्हॉट्सॲप व्हॉईस किंवा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड कसा करायचा, ‘हे’ ॲप येईल कामाला..

व्हॉट्सॲप म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे एक सोशल मीडियाॲप आहे. आपल्यातील प्रत्येक जण दररोज व्हॉट्सॲप वर तासन् तास किंवा कामापुरते का होईना सक्रिय असतात. व्हॉट्सॲपवर काही महत्त्वाची कामे आपल्याला फाईलच्या स्वरूपात सेव्ह करता येतात परंतु महत्त्वाचे कॉल आपण रेकॉर्ड करू शकत नाही.

आपल्या गरजेची माहिती, टिप्स, मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मीटिंग करून आपण पुन्हा पाहू शकत नाही. यामुळे महत्त्वाच्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो किंवा कामात अडथळा येऊ शकतो. म्हणून आपल्याला पुन्हा-पुन्हा ऐकण्याची गरज लागते, यासाठी एक उपाय आम्ही देणार आहोत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कधी महत्त्वाची मीटिंग तुम्ही व्हॉट्सॲप व्हॉईस कॉल किंवा व्हिडिओ कॉलद्वारे करत असाल तर सध्या ग्रुप व्हिडिओ कॉलच्या फिचरद्वारे व्हॉट्सॲपवर आपण मिटींगदेखील करू शकतो.

पण व्हिडीओ किंवा व्हॉईस कॉल रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. आता असे महत्त्वाचे कॉल्स आपल्याला रेकॉर्ड करण्याची गरज ओळखूनच यावर एक खास सोल्युशन म्हणजे आपल्याला कॉल रेकॉर्डर-क्यूब एसीआर नावाने गुगल प्ले स्टोअरवर जाऊन असं सर्च करावं लागेल. यानंतर कॉल रेकॉर्डर नावाखाली क्यूब ॲप्स लिमिटेड असं नाव आहे, का ही खात्री करा आणि इन्स्टॉल करा. आता व्हॉट्सॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला एक वेगळे क्यूब कॉल विजेट दिसून येईल. यामुळे तुम्ही जेव्हा व्हॉट्सॲप कॉल कराल तेव्हा हे ॲप तुमचा कॉल रेकॉर्ड करेल आणि सेव्ह करेल.

जर तुम्हाला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग नावाचं फीचर असेल त्याद्वारेही तुम्ही व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करू शकता. व्हि़डिओ कॉल रेकॉर्ड करण्यासाठी ते फीचर ॲक्टिव्हेट करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही समस्येशिवाय व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करता येईल. लक्षात घ्या की हे ॲप्स थर्ड पार्टी ॲप्स असून याबद्दल तुम्हाला एकदा खात्री करून घ्यावी लागेल की हे कितपत सुरक्षित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -