आयसीसी T20 वर्ल्डकप (ICC T20 World Cup) स्पर्धेच्या सेमी फायनलमधून बाहेर पडल्यानंतर आणि मोठ्या स्पर्धांमध्ये सतत अपयशी ठरल्यानंतर इंडियन क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या तयारीदरम्यान बीसीसीआय भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) मोठी जबाबदारी सोपवणार आहे. रिपोर्टनुसार, भारतीय T20 क्रिकेटच्या सेटअपसह मोठ्या भूमिकेसाठी BCCI धोनीला मोठी जबाबदारी देऊ शकते. बीसीसीआय भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी धोनीला बोलावण्याचा विचार करत आहे. कारण आता IPL 2023 नंतर धोनी यामधून संन्यास घेऊ शकतो. यानंतर त्याला मोठी जबाबदारी सोपवली जाईल.
रिपोर्ट्सनुसार BCCI महेंद्रसिंग धोनीला T20 क्रिकेट संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेट (director of cricket) हे पद देऊ शकते. कारण मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे टेस्ट, वनडे आणि टी-20 संघांची जबाबदारी आहे, त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. आता BCCI त्यांच्याकडून T20 ची कमान घेऊन महेंद्रसिंग धोनीकडे देऊ शकते. टी-20 क्रिकेटमधील महेंद्रसिंग धोनीच्या क्षमतेचा टीम इंडियाला फायदा घेता यावा यासाठी महेंद्रसिंग धोनीची डायरेक्टर ऑफ क्रिकेटपदी नियुक्ती केली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे मत आहे. रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या एपेक्स काउंसिलच्या मीटिंगमध्ये या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होऊ शकते. असे झाल्यास भारतीय टी-20 संघ पुन्हा जोमात येईल.
महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2023 च्या खेळातून निवृत्त होऊ शकतो, असा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर बीसीसीआय त्याला त्याचा अनुभव आणि तंत्राचा योग्य वापर करण्याची मोठी जबाबदारी देऊ शकते. भारताला दोनदा विश्वचषक चॅम्पियन बनवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला विशेषत: टीम इंडियासोबत टी-20 संघ चालवण्यास सांगितले जाऊ शकते. धोनीला कधी आणि कोणत्या फॉरमॅटमध्ये ही जबाबदारी दिली जाईल याबाबत बीसीसीआयकडून मात्र अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
यापूर्वीही माहीने टीमसोबत केले आहे काम
महेंद्रसिंग धोनी 2021 च्या T20 वर्ल्ड कप दरम्यान टीम इंडियाशी जोडला गेला होता. त्यावेळी टीम ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होती. मात्र, आता परिस्थिती बरीच बदलली असून धोनीला संघात सामील करून घेतल्यास टीम इंडिया टी-20 फॉरमॅटमध्ये अजिंक्य ठरू शकेल, असे बीसीसीआयला वाटते. महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये आहे. येथून निवृत्त झाल्यानंतर तो बीसीसीआयमध्ये सामिल होण्याची शक्यता आहे.