ताजी बातमी ऑनलाइन टीम
सूर्यकुमार यादवने रविवारी न्यूझीलंड विरुद्ध कमाल केली. त्याने 51 चेंडूत नाबाद 111 धावा फटकावल्या. टी 20 मधील नंबर 1 फलंदाजाने 7 सिक्स आणि 11 चौकार लगावले. सूर्याचा स्ट्राइक रेट 217 चा होता. सूर्यकुमार यादवने दुसऱ्यांदा टी 20 क्रिकेटमध्ये सेंच्युरी ठोकली. त्याच्या या शतकी खेळीला सर्वांकडून सलाम. विराट कोहलीने सुद्धा सूर्याच्या या इनिंगवर कमेंट केलीय.
सूर्यकुमार यादवच्या या इनिंगला विराट कोहलीने सलाम केला. “नंबर 1 बॅट्समन दाखवतोय, क्रिकेट विश्वात तोच सर्वोत्तम का आहे?. मी त्याची ही इनिंग लाइव्ह पाहू शकलो नाही. पण मला विश्वास आहे, ही इनिंग नक्कीच व्हिडिओ गेम सारखी असणार” असं विराटने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
सूर्यकुमार यादवच्या शतकानंतर विरेंद्र सेहवागने आकाशाचा फोटो शेयर केलाय. “आजकाल आकाशात आग दिसते. या खेळाडूची आपलीच लीग आहे” असं सेहवागने म्हटलय. “सूर्यकुमार यादव कुठल्याही ग्रहावर बॅटिंग करु शकतो” असं इरफान पठानने म्हटलय. इरफानशिवाय इयन बिशपने सुद्धा त्याच कौतुक केलय.