मिरजेतील फळ गोडाऊनला आग लागून लाखो रुपयाची नुकसान झाल्याची घटना घडली आहे.मिरजेतील गुरुवार पेठ शाळा क्रमांक सात जवळील फळ गोडाऊनला अचानक आग लागल्याने एकच तारांबळ उडाली होती.फळ गोडाऊनच आगीच्या आरोळ्यात आल्याने लाखो रुपयांच्या फळाचा कोळसा झाला.या सोबतच सहा ते सात हात गाड्या जळून खाक झाल्या आहेत.आज पहाटेच्या सुमारास फळ व्यापारी लियाकत बागवान यांच्या गोडाऊनला अचानकपणे आग लागली.सफरचंद तसेच आणखीन काही फळे स्टाॅक करून ठेवली होती.तर काही फळे हातगाड्यावर सकाळी विक्रीसाठी ठेवलेली असताना अचानकपणे आग लागली.सदरच्या आगीचे लोड पसरू लागल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबत अग्निशमनदाराला कळविले अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आग लागलेल्या ठिकाणी हजर झाल्या.
सदर आगीत फळ व्यापारी लियाकत बागवान यांनी सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले.तर या गोडाऊनमध्ये साधे लाईट कलेक्शन ही नसून रात्रीच्या वेळेस बॅटरीच्या आधारे या ठिकाणी लाईट लावली जाते असेही लियाकत बागवान यांनी सांगितले आगीचे कारण समजू शकले नाही तर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने अग्निशमन दलाच्या दोन गाड्या येऊन ही आग आटोक्यात आणली.यावेळी अग्निशमन दलाकडून उप अग्निशमन अधिकारी सुनील माळी,सचिन जगताप,राजू शेख,जावेद मुश्रीफ,विजय कांबळे,सागर भातमरे,अमोल गडदे,देविदास मानकरी इत्यादींनी आग आटोक्यात आणली. तर धनगर गल्ली,तेली गल्ली,बोकड चौक,बागवान गल्ली या ठिकाणी रोडवरच गाड्या लावल्या जातात.त्यामुळे काही हानी झाल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आत जाण्यास येत नसल्याने याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे.






