भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अखेरचा वन-डे सामनाही पावसाने हिरावून नेला. पहिला सामना न्युझीलंडने जिंकला होता. त्यामुळे 3 सामन्यांची ही मालिका न्यूझीलंडने 1-0 अशी जिंकली. टी-20 व वन-डे मालिकेतही पावसाचाच खेळ पाहायला मिळाला.
भारताची खराब बॅटिंग
क्राइस्टचर्चच्या मैदानावर न्युझीलंडने टाॅस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. वाॅशिंग्टन सुंदर (51) व श्रेयस अय्यरमुळे भारताला 219 धावांची मजल गाठता आली. इतरांनी साफ निराशा केली.
भारताच्या 220 धावांचा पाठलाग करताना, न्युझीलंडने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर फिन एलनने (57) व काॅन्व्हे (ना. 38) यांनी 97 धावांची भागीदारी केली. 18 षटकात पावसाला सुरुवात झाली नि त्यानंतर पाऊस थांबलाच नाही.
डकवर्थ लुईस नियमानुसार, विजेता घोषीत करण्यासाठी किमान 20 षटकांचा खेळ होणे आवश्यक होते. मात्र, दोन षटके आधीच खेळ थांबवावा लागल्याने न्युझीलंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला.